कोरोनाची खबरदारी म्हणून पुढील ४ आठवडा बाजार राहणार बंद- समीर नलावडे….

*💫कणकवली दि.३०-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र मध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच अनुषंगाने सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव येत आहेत. यामुळे कणकवली नागरपंचतीने खबरदारी म्हणून उद्यापासून होणारा आठवडी बाजार बंद करण्याचे निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना आठवडी बाजार बंद राहणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. कारण परराज्यातून,परजिल्ह्यातून येणाऱ्या विक्रते व त्यांच्या मालामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये. नागरिकानी ही खरेदीसाठी गर्दी करुन कोरोनाचा संसर्ग होऊ नये. म्हणुन पुढील मंगळवारी होणारे चार आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे,असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page