*💫कुडाळ दि.३०-:* अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा व अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला फुस लावुन पळवुन नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संभाजी उर्फ आनंद राणे (२५, रा. डिगस) याला न्यायालयाने.२ डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात त्या मुलीच्या वडीलांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा व ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तिने तिला फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मुलीचा शोध कुडाळ पोलीस घेत होते. दरम्यान डिगस येथील संभाजी राणे या युवकावर पोलिसांचा संशय असल्याने पोलिसांनी त्याला डिगस येथुन ताब्यात घेतले. सदरची युवती तो सावंतवाडी येथे राहत होता. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेल्या प्रकरणी तसेच त्या युवतीशी शारीरीक संबंध ठेवल्या प्रकरणी संभाजीवर पॉस्कोचा गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ डिसेंबर पर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेल्याप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी
