तालुक्यातील अंतर्गत रस्ते सूसज्य करण्यास मंजुरी

पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांची डागडुजी : बाबुराव धुरी *💫दोडामार्ग दि.०६-:* दोडामार्ग तालुक्यातील नादुरुस्त असलेले अंतर्गत रस्ते सूसज्य करण्यास मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत कोलझर-कुंब्रल-पणतुर्ली या भागातील ८.०० कि. मी लांबीचा, पिकुळेतीठा ते उसप येथील ४.०० कि. मी लांबीचा तर भेडशी-खानयाळे-शिरंगे पुनर्वसन येथील ४.०० कि. मी लांबीचा या रस्त्यांची सगडुजी लवकरच होणार आहे….

Read More

शिवसेना आपल्या दारी हा कानमंत्र घेऊन शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा : संजय पडते

कुडाळ शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ *💫कुडाळ दि.०६-:* शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी शुभारंभ करत असताना टार्गेट ठेवून काम करा. कुडाळ शहरात शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे हि जनतेपर्यंत पोहोचवा शिवसैनिकांनी एक दिलाने एका विचाराने काम करून प्रत्येक घराघरात शिवसेनेचा सदस्य बनवा. शिवसेना आपल्या दारी हा कानमंत्र घेऊन शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा असे आवाहन…

Read More

जिल्ह्यात एकूण ४ हजार ९९३ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या २६८ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी १३ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९९३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

पक्षाने दिलेली सदस्य नोंदणीची जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीरित्या पार पाडावी : वैभव नाईक

शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम : आमदार नाईक यांच्या हस्ते ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ *💫मालवण दि०६-:* सदस्य नोंदणी करताना जे नवीन लोक आहेत, जे कुठल्याही पक्षात नाहीत त्यांना आपण शिवसेना सदस्य होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. पक्षाने दिलेली सदस्य नोंदणीची जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीरित्या पार पाडावी. जी प्रलंबित विकास कामे आहेत ती देखील येत्या काळात मार्गी लावली जातील…

Read More

तंत्रशिक्षण विभागाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात

१० औगस्टपासून प्रथम वर्ष पदविका तर १७ पासून द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू *💫मालवण दि०६-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०- २१ करिता होणार्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया १० ऑगस्टपासून आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू करण्यांत आली आहे. त्या अनुषंगाने सर्व…

Read More

मनरेगा अंतर्गत गोळवण रस्त्याचे करण्यात आले भूमिपूजन

मालवण सभापती अजिंक्य पाताडे आणि उपसभापती राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन *💫मालवण दि०६-:* मालवण तालुक्यातील गोळवण येथे मनरेगा अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन मालवणचे सभापती श्री अजिंक्य पाताडे आणि मालवणचे उपसभापती श्री सतीश उर्फ राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ माधुरी बांदेकर, गटविकास अधिकारी श्री जयेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्या…

Read More

एक वही एक पेन अभियानास मलवणात उस्फुर्त प्रतिसाद

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टायगर ग्रुप मालवण ने केले होते आयोजन *💫मालवण दि.०६-:* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मालवणच्या टायगर ग्रुपतर्फे राबविण्यात आलेल्या एक वही एक पेन अभियानाला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी मालवणच्या समाज…

Read More

जनतेने वारंवार नाकारलेल्यानी आमने सामने ची करू नये भाषा- सुनील बांदेकर

*💫कुडाळ दि. ०६-:* जनतेने वारंवार नाकारल्याने पराभवाची हॅट्रिक पूर्ण केलेल्यानी आतातरी आमने सामने निवडणूक लढवण्याची भाषा करू नये असा जोरदार टोला भाजपचे कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा नियोजन समिती सदस्य सुनील बांदेकर यांनी शिवसेनेच्या कुडाळ शहर अध्यक्ष संतोष शिरसाट यांना लगावला आहे. आपण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून चारीमुंडीचित झाला आणि कोणाशी गद्दारी करून पुन्हा कोणाची…

Read More

बहुजन मुक्ती पार्टी तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर चरणी वाहण्यात आली आदरांजली

बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन *💫सावंतवाडी दि.०६-:* भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न- विश्वरत्न महामानव प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव तसेच तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पुष्पहार अर्पण…

Read More

मातीच्या जैवविविधतेचे संरक्षण काळाची गरज

प्रा विकास धामापूरकर *💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जमिन हा सृष्टीचा मूलभूत आधार. आहे मानवी जीवनाच्या अपरिमीत गरजा पृर्ण करण्याचे काम जमीन अविरतपणे करीत आहे. सृष्टीवरील 90 टक्के पेक्षा जास्त सजिव आपले जीवन मातीमध्ये पूर्ण करतात. जमिनीवरील सजीव सृष्टीचा मानवी जीवनावर, थेट परिणाम होत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकाने जमिन जिवंत ठेवण्यासाठी आणि तिच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी…

Read More
You cannot copy content of this page