*💫कुडाळ दि. ०६-:* जनतेने वारंवार नाकारल्याने पराभवाची हॅट्रिक पूर्ण केलेल्यानी आतातरी आमने सामने निवडणूक लढवण्याची भाषा करू नये असा जोरदार टोला भाजपचे कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक तथा नियोजन समिती सदस्य सुनील बांदेकर यांनी शिवसेनेच्या कुडाळ शहर अध्यक्ष संतोष शिरसाट यांना लगावला आहे. आपण कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून चारीमुंडीचित झाला आणि कोणाशी गद्दारी करून पुन्हा कोणाची तळी उचलतात याचे आत्मपरिक्षण प्रथम शहरत अध्यक्ष संतोष शिरसाट यांनी करावे. आरक्षणानंतर नगराध्यक्ष काय करतील याचा विचार न करता ठराविक काळापूरती शिवसेना पक्षात असलेल्या आपल्याला पुढील निवडणूकीत पक्ष तिकीट तरी देईल काय? तसेच ग्रामपंचायत काळापासून वारंवार निवडणूक लढवून देखील नगरपंचायत निवडणूकीपर्यंत जनता वारंवार का आपल्याला नाकारते याची काळजी करा असही त्यांनी सांगितले. कुडाळ मच्छिमार्केट इमारत जागा व भाजी मार्केट जागा नगरपंचायत प्रशासनाच्या नावे असल्या शिवाय मच्छिमार्केट व भाजी मार्केट इमारत करता येणे शक्य नाही. ज्यांना प्रशासनाचा ‘ प्र’ आणि राजकारणातला ‘ र’ माहिती नाही यांनी विकासात्मक गोष्टीवर चर्चा करू नये. जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही व वारंवार पाठपुरावा करून देखील मच्छिमार्केट जमीन नगरपंचायतीच्या नावावर होवू नये म्हणून पडद्यामागील सुत्रधार कोण हे सुध्दा जनतेला माहिती आहे. कोवीड काळात नगरपंचायत प्रशासन राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासन, प्रांत कार्यालय यांच्या येणाऱ्या आदेशानुसार काम करत होते. कोवीड काळात कुडाळ शहरातील सर्व व्यापारी बंधू, व्यापारी संघटना व नागरिक यांनी कोणतेही हेवे दावे न करता नगरपंचायत प्रशासनाला मोलाची साथ दिली. परंतु कोणतीही सहकार्याची भुमिका न घेणाऱ्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही असही ते म्हणाले. घंटनाद आंदोलनादिवशी कुडाळ शहरातील हायवे प्रकल्पग्रस्थांचा रस्त्या संदर्भातील विषयाशी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक अचानक ठेवल्याने हे काम प्रामुख्याने महत्त्वाचे असल्याने घंटनाद आंदोलनादिवशी त्या ठिकाणी नगराध्यक्ष गेले नाहीत. मुळात नगराध्यक्षानी हा मुद्दा शोधून काढला होता. आपले शिवसेना पक्षाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक २६ ऑगस्ट २०२० रोजी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे काय झाले? की आपलेच शिवसेनेचे मंत्री कोणत्या अॅडजेस्टमेंट मुळे गप्प बसले? मंत्र्यांनी दिलेल्या चौकशीला केराची टोपली रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दाखविली की काय? हे जाहिर करावे! मागच्या पत्राकामध्ये आपल्याला दिलेली उपमा ‘ कोरोना परवडला पण कुर्ले आवरा’ ही योग्य रित्या लागू होत आहे. हे आपण सिध्द केले. असे सुनिल बांदेकर यांनी प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे.
जनतेने वारंवार नाकारलेल्यानी आमने सामने ची करू नये भाषा- सुनील बांदेकर
