भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टायगर ग्रुप मालवण ने केले होते आयोजन
*💫मालवण दि.०६-:* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मालवणच्या टायगर ग्रुपतर्फे राबविण्यात आलेल्या एक वही एक पेन अभियानाला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी मालवणच्या समाज मंदिर येथे एक वही एक पेन अभियान राबविण्यात येते. या अभियानातर्गत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन साहित्य दिले जाते. या अभियानाला दरवर्षी मालवणात चांगला प्रतिसाद मिळतो यावर्षी हे अभियान मालवणच्या टायगर ग्रुप तर्फे राबविण्यात आले या अभियानाचा शुभारंभ मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर सामाजिक कार्यकर्ते पी.के.चौकेकर, टायगर ग्रुपचे पदाधिकारी वैभव वळंजू, मालवण पत्रकार समिती अध्यक्ष प्रफुल्ल देसाई,पत्रकार मनोज चव्हाण, अमित खोत, संग्राम कासले, महेश कदम, सिद्धेश आचरेकर, भूषण मेतर, पी के चौककर , विरेश वळंजू आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वही व पेन अर्पण करुन डाँ. आंबेडकर यांना अभिवादन केले.टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष कडूलकर, जिल्हा उपाध्यक्ष हर्शल बळेकर, जिल्हा संघटक प्रयाग कांबळे, जिल्हा प्रसिद्घी प्रमुख सिद्धेश भोगले, कोकण कमिटी सदस्य मंदार गावडे यांच्या आयोजनात कार्यक्रम घेण्यात आला.