Headlines

प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी उद्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन सत्र

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०१-:* जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत उद्या गुरुवार दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे तिसरे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 ऑनलाईन होत आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने…

Read More

मोदी सरकारच्या विक्रमी लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र मागेच

अपयश झाकण्यासाठी जनतेस घरात बसविण्याचा डाव;आम.नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा *⚡कणकवली ता.०१-:* जगभरातील निवडक प्रसिद्धी माध्यमांच्या अपप्रचारास चोख प्रत्युत्तर देत देशातील तब्बल ६५ कोटी १५ लाख लोकसंख्येच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा गाठणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी लसीकरणात महाराष्ट्र मात्र अजूनही रेंगाळलेलाच असून लसीकरणाबाबतच्या धोरणलकव्यामुळे लस मिळविण्याकरिता राज्यातील जनतेची केविलवाणी धडपड सुरू आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत आठव्या…

Read More

गणेशोत्सव कालावधीकरिता कणकवली नगरपंचायतीने भाजी, फळे, फूले व अन्य विक्रीबाबत केले नियोजन ​​ ​​

डीपी रोड, बाजारपेठेत रस्त्यावर विक्रेते बसल्यास कारवाईचा करण्याचा इशारा ​​ *⚡​कणकवली ता.०१-:* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात भाजी, फळ, फूल ,कपडे व स्टेशनरी, कटलरी साहित्य विक्रेत्यांसाठी नियोजन करण्यात आले असून कणकवली शहरात वाहतूक कोंडी उद्भवू नये व जनतेला योग्य प्रकारे शहरात सुविधा मिळावी या दृष्टीने कणकवली नगरपंचायतकडून गणेशोत्सवाचे नियोजन झाले आहे. गणेशोत्सव काळात डीपी रोडवर भाजी…

Read More

राष्ट्रवादीला सोहेब खान यांचा रामराम

भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश *⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ शहर पान बाझार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोहेब खान यांनी आज जाहीर रित्या भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुका अध्यक्ष विनायक राणे, युवा नेते आनंद शिरवलकर, ओबोसी जिल्हाध्यक्ष दिपक नारकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, माजी सरपंच प्रशांत राणे,…

Read More

कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणता मग २७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना कमी का करता?

तिसऱ्या लाटेत जिल्हा आरोग्य विभाग काय करणार? ;परशुराम उपरकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.०१-:* एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून शासनाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. निधी आयोगाने दररोज देशात पाच लाख कोरोना रुग्ण मिळतील असा अंदाज वर्तविला आहे असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये खासगी पद्धतीने सेवा देणाऱ्या २७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा थांबवण्यात आली आहे.आता…

Read More

कुडाळ पोलीस ठाण्याचे फुलचंद मेंगडे नवे इनचार्ज

शंकर कोरे यांची सावंतवाडीत बदली;भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणेंनी दिल्या शुभेच्छा *⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांची बदली सावंतवाडी पोलीस ठाण्यात झाल्याने त्यांच्या जागी देवगड येथे प्रभारी निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले फुलचंद मेंगडे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी यापूर्वी रायगड येथे ३ वर्षे पोलीस…

Read More

भाजपच्या नेत्यांचा मुक्त अर्थव्यवस्थेकडे कल

*⚡कणकवली ता.०१-:* भाजपने तरुणांना कोट्यावधी नोकऱ्या उपलब्ध करुन देणार या सारख्या आश्वासनांनी २०१४ ची लोकसभा जिंकली. हिंदुत्वाच्या नावाखाली २०१९ ची लोकसभा जिंकली. मात्र गेल्या सात वर्षांत नोकर्यांच्या नावाने बोंबच आहे. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या खाजगी उद्योजकांच्या घशात घालण्याचे धोरण अवलंबून आहे तो रोजगार बुडविण्याचे काम सुरू केले आहे. भाजप या पक्षातील नेतेमंडळी व्यापारी व्रुतीची आहेत….

Read More

सबनीसवाडा येथील महिलेची गळफास लावून आत्महत्या

*⚡सावंतवाडी दि.. ३१-:* येथील सबनीसवाडा परिसरात असलेल्या एका इमारतीत महिलेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार रात्री उशीरा उघड झाला. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. याबाबतची माहीती सावंतवाडी पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे

Read More

लहान मुलांच्या हस्ते हंडी फोडून एकता मित्रमंडळातर्फे साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा

*⚡मालवण ता.३१-:* मालवण मधील एकता मित्रमंडळातर्फे वार्षिक दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आली. कोरोना विषयक शासनाच्या नियमांचे व निर्बंधांचे पालन करत मित्रमंडळाने एकदम साध्या पद्धतीने जमिनीलगत हंडी बांधून ती लहान मुलाच्या हस्ते फोडण्यात आली. मालवण मधील हे मंडळ नेहमीच आपल्या आदर्शवत कार्यपद्धतीने आणि कोरोनाच्या काळात सुद्धा समाजहिताचे कार्यक्रम घेऊन आणि ते कोरोनाचे शासनाने घातलेल्या…

Read More

घरोघरी पूजन केलेल्या श्रीकृष्णांचे विसर्जन

*⚡वेंगुर्ला ता.३१-:* जन्माष्टमीदिवशी काहींच्या घरोघरी पूजन केलेल्या श्रीकृष्णाचे आज ओहोळात, विहिरीत तसेच मांडवी खाडी येथे विसर्जन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही परंपरेनुसार काहींनी आपल्या घरी श्रीकृष्णाचे पूजन केले. काहीठिकाणी बाळकृष्ण, गाईसमवेत श्रीकृष्ण तर राधाकृष्ण असे श्रीकृष्णाचे रुप पहायला मिळाले. सोमवारी सायंकाळपासूनच श्रीकृष्णाच्या पूजनाला सुरुवात झाली होती. रात्रौ १२ पर्यंत ठिकठिकाणी पूजन सोहळा सुरु होता. आज सायंकाळी…

Read More
You cannot copy content of this page