गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांकडे साईंची पालखी दाखल…

⚡सावंतवाडी ता.०९-: गुरूपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील प्रती शिर्डीची पालखी दाखल झाली. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी श्री साईची पालखी दाखल होते. केसरकर दांपत्याकडून यावेळी पादुकापुजन केले जाते.

बुधवारी सायंकाळी केसरकर यांच्या निवासस्थानी श्री साईंची पालखी दाखल झाली. दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते साईबाबांच्या मूर्तीवर अभिषेक करून पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर साईंची महाआरती झाली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दत्ता सावंत, शुभांगी सुकी,ॲड. निता कविटकर, दिपाली सावंत, शर्वरी धारगळकर, किरण नाटेकर, दत्ताराम वाडकर, अर्चित पोकळे, सुजित कोरगावकर यांसह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page