दोडामार्गात शिवसेनेचे विजयी उमेदवारांचा संजू परब यांच्या हस्ते सत्कार…

⚡दोडामार्ग ता.११-: तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने सर्व उमेदवार विजयी करत ऐतिहासिक यश मिळवले. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

मणेरी जिल्हा परिषद सदस्य सौ. साक्षी तळवडेकर, झरेबांबर पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, कोनाळ पंचायत समिती सदस्य सायली निंबाळकर तसेच कोलझर पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रेमानंद देसाई, विशांत तळवडेकर, गोपाळ गवस, सुनिल गवस, सौ. सावंत, सौ. गवस, कु. विशाखा नाईक, सौ. पूजा देसाई, बळीराम शेटये, अनिल शेटकर, राजन गवस, स्वप्निल निंबाळकर, दादा देसाई, रामदास मेस्री, अमरसिंग राणे, भगवान गवस, राजेश नाईक, गुरुदास सावंत, राकेश धर्णे, सुर्यकांत गवस, विलास सावंत, उमेश सातार्डेकर, बबलू पांगम आदी उपस्थित होते.
यावेळी संजू परब यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले तसेच पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.

You cannot copy content of this page