दुचाकीवरून पडल्याने पाडलोस येथील महिलेचा मृत्यू…!

बांदा/प्रतिनिधी
पाडलोस येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा त्यांचे वाटेतच निधन झाले. लक्ष्मी नारायण माळकर (वय ६०) रा. पाडलोस असे त्यांचे नाव आहे.
हा अपघात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर त्यांना तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग यांनी प्राथमिक उपचार केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचे निधन झाले.

You cannot copy content of this page