रेडीचे सुपुत्र प्रितेश राऊळ यांचा आडेलीतील पाणी समस्येबाबत यशस्वी तोडगा…

आडेली माजी सरपंच प्रकाश गडेकर यांची आजही सामाजिक बांधिलकी कायम….

⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांना जुन्या विहिरीवरील पाण्याचा साठा अत्यल्प झाल्याने पाणीटंचाईची निश्चितच मोठी झळ पोहोचली होती. याबाबत संबंधित आडेली ग्रामपंचायत सरपंच तसेच वेंगुर्ला पंचायत समिती अधिकारी यावर यशस्वी तोडगा काढू शकले नव्हते. त्यामुळे नागरिकांना व महिलांना रहाटाद्वारे पाणी काढून हाल सोसावे लागत होते व हे पुरेसे नव्हते. आजही घरोघरी नळपाणी पुरवठा होत असल्याच्या बाता मारणाऱ्या शासनाला येथील गरीब वस्तीतील नागरिकांना कायमस्वरूपी नळपाणी पुरवठा देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे एकच असंतोष निर्माण झाला होता. याबाबत वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनीही शासनाकडे प्रयत्न केले होते. त्यानंतर शुक्रवारी 5 जून रोजी सलग दोन वेळा “जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती” बनलेले भाजपाचे “रेडी”गावचे सुपुत्र प्रितेश शंकर राऊळ यांनी आडेली गावची व्यथा जाणून घेत संबंधित उपअभियंता यांना तशा सूचना केल्या. आडेली जिल्हा परिषद व आडेली पंचायत समिती मधून निवडून आलेले नवनिर्वाचित दोन्ही लोकप्रतिनिधी या “गंभीर बाबीकडे” दुर्लक्ष व कानाडोळा करीत असताना जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ यांनी स्वतः जातीनिशी लक्ष घालून यावर तोडगा काढण्यात यश मिळवले आहे. दरम्यान याबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आडेली श्री देव सोमेश्वर सोसायटी चेअरमन प्रकाश महादेव गडेकर यांनी तातडीने सोसायटीच्या बोअरवेल वरून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास होकार दर्शविला. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ तसेच आडेली गावातील दानशूर व्यक्तिमत्व माजी सरपंच व विद्यमान आलेली श्री देव सोमेश्वर सोसायटीचे चेअरमन प्रकाश गडेकर यांच्या दानशूर वृत्तीचे आजही समाजातून कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page