⚡मालवण ता.०६-:
मालवण एसटी आगार येथील गाळ व झाडी-झुडपे यांनी भरलेली विहीर उपनगराध्यक्ष दीपक पाटकर व स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांनी स्व:खर्चाने गाळमुक्त व स्वच्छ करून दिली आहे.
मालवण एसटी आगार येथे रोजच्या पाणी वापरासाठी तसेच गाड्या स्वच्छता यासाठी पाण्याचा वापर होत असलेली विहीर गाळ व झाडी-झुडपे यांनी भरली होती. बसस्थानक येथे काही कामानिमित्त गेलेल्या उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब दिसून आली. दीपक पाटकर, पुनम चव्हाण यांनी ती विहीर स्वखर्चाने गाळमुक्त व स्वच्छ करून दिली आहे. पाटकर व चव्हाण यांच्या सेवाकार्या बाबत आगार व्यवस्थापक अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
जनतेची सेवा हेच आपले पहिले कर्तव्य असले पाहिजे. हीच शिकवण खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची आहे. त्यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या मार्गदर्शनात लोकप्रतिनिधी म्हणून सेवाकार्य करत असताना सामाजिक भावनेतून आपण काम करत आहोत. मालवण शहर वासियांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे दिपक पाटकर, पुनम चव्हाण यांनी या निमित्ताने सांगितले.
