⚡मालवण ता.०६-:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि मनसेचे नेते शिरीष सावंत, संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील हेदुळ गावातील अनेक कार्यकर्त्यांनी काल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षाच्या वतीने सर्व प्रवेशकर्त्यांचे मनसेची मानाची शाल पांघरून पक्षात अधिकृत स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर आणि शहराध्यक्ष सागर जाधव यांनी हेदुळ गावातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात मनसे पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. तसेच यापुढेही तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा धडाका असाच सुरू राहील, असा विश्वास गणेश वाईरकर यांनी व्यक्त केला.
हेदुळ गावातील विभागअध्यक्ष संतोष सावंत आणि शाखाध्यक्ष सूरज पुजारे यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिकांच्या उपस्थितीत दिपाली दिवाकर पुजारे, प्रीतेश सावंत, दर्शन सावंत, शुभम पुजारे, धाकू राऊळ, भिकाजी परब, रूपेश गावडे, पीयूष पुजारे यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन आणि शहराध्यक्ष सागर जाधव हे उपस्थित होते
