भटवाडी शाळा नंबर सहा येते एक दिवस बळीराजासाठी म्हणजेच बांधावरची शाळा हा उपक्रम साजरा…

मा.नगरसेविका सौ दिपाली दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत..

⚡सावंतवाडी ता.१०-: कै लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि प शाळा नंबर सहा भटवाडी सावंतवाडी या शाळेने एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला भटवाडीतील प्रसिद्ध शेतकरी श्री मोहन गावडे यांच्या शेतात सर्व विद्यार्थी शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासह हा उपक्रम राबविण्यात आला

भात रोप ( तरवा ) काढणे नांगरणी, भात रोप लावणी, शेतकऱ्याची मुलाखत,बळीराजाचा सत्कार आणि स्नेहभोजन अशा विविध कृतीतून आजचा दिवस आनंदात साजरा करण्यात आला
यावेळी शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर यांच्या हस्ते बळीराजा श्री व सौ मोहन गावडे श्री व सौ उमेश गावडे , श्री व सौ देवू गावडे आणि कुटुंबीय यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी मा.नगरसेविका दिपाली भालेकर शाळेच्या अध्यक्षा सौ समीक्षा खोचरे उपाध्यक्ष सौ पूनम तुयेकर शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर श्री गुरुप्रसाद तेजम सौ जानवी वारीक श्रीमती अश्विनी गावडे सौ दीपा गावडे शाळेचे मुख्याध्यापक श्री केशव जाधव सर सहाय्यक शिक्षिका सौ सायली लांबर सौ मेधा गावडे बालवाडी शिक्षिका सौ गावडे बाई तेजस गावडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page