धक्का मित्रमंडळातर्फे गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप…

⚡मालवण ता.०९-:
सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या मालवण मधील धक्का मित्रमंडळ या ग्रुपच्या वतीने मालवण शहरातील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व कन्याशाळा या शाळांमधील गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. तर फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी वस्तू देण्यात आल्या.

यावेळी धक्कादायक मित्रमंडळाचे सदस्य शंकर पाटकर, संजय गावडे, बाबू डायस, हेमंत शिरगांवकर, देवा तोडणकर, नितेश जाधव, नितिन कोटीयान, डॉ. धनंजय सावंत, प्रतिक कुबल, केशव साठे, शर्मिला गावकर, प्रशांत हिरणवाळे यांच्यासह आणि कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. साटलकर व इतर शिक्षक उपस्थित होते.

You cannot copy content of this page