१० औगस्टपासून प्रथम वर्ष पदविका तर १७ पासून द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
*💫मालवण दि०६-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०- २१ करिता होणार्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया १० ऑगस्टपासून आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ ऑगस्टपासून सुरू करण्यांत आली आहे. त्या अनुषंगाने सर्व पदविका अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा ७ डिसेंबर असून अंतिम गुणवत्ता यादी १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम गुणवत्ता यादीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विकल्प अर्ज भरून निश्चित करणे, कॅप जागा वाटप, झालेले जागा वाटप स्वीकारण्यापूर्वी स्वत: पडताळणी करणे, जागा वाटप स्वीकारणे, जागा स्वीकृती शुल्क भरणे, जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी उपस्थित राहणे याबाबतचे प्रवेश प्रक्रियेचे दोन फेयांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे. अंतिम गुणवत्ता यादीनंतर आपल्याला जे कॉलेज व जी शाखा निवडायची असेल, त्यासाठी पहिल्या फेरीसाठी विकल्प अर्ज (Option Form) आपल्या लॉगीनमधून १२ ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये भरावे लागणार आहेत. आपण दिलेल्या विकल्पानुसार पहिल्या फेरीमध्ये कोणते कॉलेज व शाखा मिळाली आहे किंवा नाही हे आपल्या लॉगीनमध्ये १६ डिसेंबर रोजी समजणार आहे. प्रथम फेरीसाठी झालेले जागा वाटप स्वीकारण्यापूर्वी स्वत: पडताळणी करणे, जागा वाटप स्वीकारणे, जागा स्वीकृती शुल्क भरणे हे १७ ते १८ डिसेंबर या कालावधीमध्ये करता येणार आहे. प्रथम फेरीमधील जागा वाटप स्वीकारल्यास जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी १७ ते १९ डिसेंबर या कालावधीमध्ये उपस्थित उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी विकल्प अर्ज (Option Form) हे आपल्या लॉगीनमधून २१ ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये भरावे लागणार आहेत. आपण दिलेल्या विकल्पानुसार दुसऱ्या फेरीमध्ये कोणते कॉलेज व शाखा मिळाली आहे किंवा नाही, हे आपल्या लॉगीनमध्ये २४ डिसेंबर रोजी समजणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी झालेले जागा वाटप स्वीकारण्यापूर्वी स्वतः पडताळणी करणे, जागा वाटप स्वीकारणे, जागा स्वीकृती शुल्क भरणे हे २५ ते २८ डिसेंबर या कालावधीमध्ये करता येणार आहे. द्वितीय फेरीमधील जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी २५ ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये उपस्थित उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. शासकीय तंत्रनिकेतन मालवण संस्थेमध्ये एकूण ३२० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी, संगणक (Computer) अभियांत्रिकी, विद्युत (Electrical) अभियांत्रिकी, अणुविद्युत (Electronics & Communication). अभियांत्रिकी, यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी प्रत्येकी प्रवेश क्षमता ६० व अन्न तंत्रज्ञान (Food Technology) प्रवेश क्षमता २० या पदविका अभ्यासक्रमाच्या शाखा कार्यान्वित आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.