पक्षाने दिलेली सदस्य नोंदणीची जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीरित्या पार पाडावी : वैभव नाईक

शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम : आमदार नाईक यांच्या हस्ते ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

*💫मालवण दि०६-:* सदस्य नोंदणी करताना जे नवीन लोक आहेत, जे कुठल्याही पक्षात नाहीत त्यांना आपण शिवसेना सदस्य होण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. पक्षाने दिलेली सदस्य नोंदणीची जबाबदारी प्रत्येकाने यशस्वीरित्या पार पाडावी. जी प्रलंबित विकास कामे आहेत ती देखील येत्या काळात मार्गी लावली जातील असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी कोळंब येथे बोलताना केले मालवण तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमांना सुकळवाड येथून सुरुवात करण्यात आल्यानंतर पोईप, मसुरे, कोळंब, तोंडवली या पंचायत समिती मतदार संघात कार्यक्रम घेण्यात आले. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका निरीक्षक अतुल रावराणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कोळंब येथे नोंदणी केलेल्यांना आमदार नाईक यांच्या हस्ते ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मसुरे येथे कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत , तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, युवा सेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, महिला आघाडीच्या श्वेता सावंत, पूनम चव्हाण, छोटू ठाकूर, संदीप हडकर,सुहास पेडणेकर, राजेश गावकर, बाबू आंगणे, आबा परब, आदिती मेस्त्री, सुजाता पेडणेकर, माया मुणगेकर, मानसी चव्हाण, सचिन पाटकर, राहुल सावंत, सुशांत माने तर कोळंब- कांदळगाव येथे उपविभागप्रमुख अमोल वस्त, विजय नेमळेकर, महेश सुर्वे, रणजित परब, मीनल परब, नेहा कांबळी, दीपक परुळेकर, विकास आचरेकर, बाबू पेडणेकर तसेच तोंडवली येथे पंचायत समिती सदस्य निधी मुणगेकर, अनुष्का गावकर, विभागप्रमुख उदय दुखंडे, भाऊ परब, आबा कांदळकर, जगदिश पांगे, नितीन घाडी आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page