प्रा विकास धामापूरकर
*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जमिन हा सृष्टीचा मूलभूत आधार. आहे मानवी जीवनाच्या अपरिमीत गरजा पृर्ण करण्याचे काम जमीन अविरतपणे करीत आहे. सृष्टीवरील 90 टक्के पेक्षा जास्त सजिव आपले जीवन मातीमध्ये पूर्ण करतात. जमिनीवरील सजीव सृष्टीचा मानवी जीवनावर, थेट परिणाम होत असतो. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक नागरिकाने जमिन जिवंत ठेवण्यासाठी आणि तिच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी जानीवपूर्वक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे शास्त्रज्ञ श्री विकास धामापूरकर यांनी केले आहे. 05 डिसेंबर 2020 या जागतिक मृदादिनानिमित माणगाव येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग व कृषी विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शेतकरी मेळ्याव्यात ते बोलत होते. यावेळी त्यानी येणाऱ्या पिढीसाठी जर सुदृढ जमीन ठेवायची असेल तर प्रत्येक नागरीकाने जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. येणा-या पूढील काळात शेतकरी बंधूनी फक्त रासायनीक किंवा एकात्मिक खत व्ययस्थापण न करता प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीत जास्त सेंद्रिय खत, जीवामृत यांचा वापर करावा.ज्यामुळे जमिनीतील, जीव सृष्टी जिवंत राहील आणि जमिन जिवंत राहण्यासाठी मदत होईल.याची माहिती श्री. धामापूरकर यांनी दिली. गेल्या काही वर्षात शेतकरी बंधू जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी असंतुलीत खताचा वापर करताना दिसतात त्याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होताना दिसतो पर्यायाने माती मधील अनेक जीव मृत्यू शय्याच्या मार्गांवर आले.जर रासायनिक खते ही माती परीक्षण करून दिली तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होईलच त्याचबरोबर उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल. असंतुलित रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये मोठया प्रमाणावर प्रदूषण होते आणि त्यामुळे निर्माण होणारे अन्न विषारी उत्पादित होते..जर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न हवे असेल तर प्रत्येक माणसाने जमीन जिवंत राहण्यासाठी त्याचबरोबर तिची जैवविविधता संरक्षित करण्यासाठी येणाऱ्या काळात जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. मातीची जैवविविधता नाष्ट झाली तर संपुर्ण सृष्टी चक्र बिघडून जाईल म्हणून या सर्व बाबींचा विचार करून मातीची जैवविविधतेचे रक्षण करा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. व्यासपीठावर तालुका कृषी अधिकारी श्री कांबळे, कृषी अधिकारी सौ वेलकर. डॉ पालसांडे, डॉ उईके उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक श्री प्रशांत कुडतडकर, श्री बावीसकर, सौ शेटीये यांनी परिश्रम घेतले या शेतकरी मेळाव्यात माणगाव खोऱ्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थिती होते.