पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्यांची डागडुजी : बाबुराव धुरी
*💫दोडामार्ग दि.०६-:* दोडामार्ग तालुक्यातील नादुरुस्त असलेले अंतर्गत रस्ते सूसज्य करण्यास मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत कोलझर-कुंब्रल-पणतुर्ली या भागातील ८.०० कि. मी लांबीचा, पिकुळेतीठा ते उसप येथील ४.०० कि. मी लांबीचा तर भेडशी-खानयाळे-शिरंगे पुनर्वसन येथील ४.०० कि. मी लांबीचा या रस्त्यांची सगडुजी लवकरच होणार आहे. अशी माहिती पंं.स.सदस्य तथा शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणारे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांचे आभार श्री धुरी यांनी मानले आहेत.