ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक तिवरे चव्हाणवाडीतील दोन युवक ठार
*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील तिवरे- डामरे येथे ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोघे युवक जागीच ठार झाले. विशाल गजानन चव्हाण (२२), सुरज रमेश चव्हाण (१९) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तिवरे-चव्हाणवाडी येथील रहिवासी आहेत.अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केल्यामुळे मयत युवकांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास…
