*⚡सावंतवाडी ता.२३-:* दिव्यांग / अपंगांचीची दिवाळी तेजोमय करण्यासाठी सिंधुरत्न दिव्यांग प्रेरक संस्थेकडून एक दिवा दिव्यांगांसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हि मदत थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित दिव्यांग कुटुंब यांना देण्यात येणार आहे. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, दिव्यांग कुटुंबे आणि वंचित मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी सिंधुरत्न दिव्यांग प्रेरक संस्थेच्यावतीने या वंचित घटकांना कपडे, पणत्या, आकाश कंदील, दिवाळी फराळ देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. कोणाला जर नवी/जुने कपडे द्यावयाची असतील तर ते शनिवार दिनांक २३ तारखेपर्यंत सिंधुरत्न दिव्यांग प्रेरक सदस्यांकडे पोहोच करावेत तर दिवाळी फराळ व साहित्य द्यावयाचे असल्यास संस्थेकडे २९ आणि ३० ऑक्टोबर या दोन दिवशी पोहोच करावे. कपडे जीर्ण फाटके असू नयेत तसेच खाद्य पदार्थ मदत म्हणून द्यावयाचा झाल्यास तो चांगला बंदिस्त करून द्यावा तर फराळासाठी आर्थिक मदत ऑनलाईन स्वरूपात रोख स्वरूपात केव्हाही सिंधुरत्न दिव्यांग प्रेरककडे अकाउंटवर जमा करू शकता. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्र. ३९२३२५२४०६८, आयएफसी कोड – एसबीआयएन०००४५११ यावर तर फोन पे गूगल पे साठी महेंद्र बाबाजी चव्हाण-९४०३८००९१५ व वस्तूरूपात मदतीसाठी सुभाष मेस्त्री, राठीवडे ८२७५६४९३७८ यांच्याशी संपर्क साधावा. समाजातील सर्व घटकांनी आपला मोलाचा हातभार लावून उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सुभाष मेस्त्री व सिंधुरत्न दिव्यांग प्रेरक संस्था व परिवार यांनी केले
*सिंधुरत्न दिव्यांग प्रेरक संस्थेकडून एक दिवा दिव्यांगांसाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन
