सावंतवाडी तालुक्यात भात कापणीच्या कामांना वेग

*⚡सावंतवाडी ता.२३ सदैव राऊळ-:* सावंतवाडी तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप घेतली असल्याने शेतकऱ्यांनी भातशेती कापणीच्या कामांना जोरदार सुरुवात केली आहे. तालुक्यातील माजगाव, बांदा, शेर्ले, कारिवडे, मळगाव, वेत्ये, चिपटे, निरवडे, माडखोल, ओटवणे, तळवडे, कोनापाल, न्हावेली, मळेवाड आदी गावांत भात कापणीच्या कामांनी वेग घेतला आहे. भरडी भातशेती तयार झाली असल्याने नवरात्रीनंतर शेतक-यांनी कापणीला जोरदार सुरुवात केली आहे. गेले दोन दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण होत असल्याने पावसाच्या भीतीने काही ठिकाणी मशीनच्या सहाय्याने भाकापणी कऱण्यात शेतकऱ्यांनी जोर धरला आहे.

You cannot copy content of this page