माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा प्रसिद्धी पत्रकातून सवाल
*⚡सावंतवाडी ता.२३-:* शहरामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसात शहरातील तसेच मुख्य बाजार पेठेतील रस्ते खोदाईची घाई कोणासाठी, असा सवाल माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. प्रसिद्धी पत्रकात भोगटे यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरात ऐन सणासुदीच्या दिवसात शहरातील तसेच मुख्य बाजार पेठेतील रस्ते केबलसाठी खोदाईचे काम चालू केल्याने व्यवसायिकांच्या धंद्यावर परिणाम होत आहे. यामुळे शहरातील व्यावसायिकात तीव्र संताप पहायला मिळत आहे. आधीच कोरोनामुळे दुकानदार डबघाईला आलेले असताना आता दिवाळी सणाच्या तोंडावर दुकानदारांच्या दुकानात या खोदाईमुळे माती, धूळ अशा कारणाने दिवाळी सणाचा माल वाया जात आहे. तरी नगरपरिषदेने या खोदाईला ऐन दिवाळीत परवानगी कशी काय दिली, याबाबत मुख्याधिकारी यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न केले असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही, असे भोगटे यांनी सांगीतले. याबाबत नगरपरिषदेने दखल घेऊन व्यावसायिकांना होणारा त्रास थांबवावा अन्यथा व्यवसायिक रस्त्यावर उतरून खोदाईचे काम आपण थांबवतील
