*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील तिवरे- डामरे येथे ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोघे युवक जागीच ठार झाले. विशाल गजानन चव्हाण (२२), सुरज रमेश चव्हाण (१९) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तिवरे-चव्हाणवाडी येथील रहिवासी आहेत.अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केल्यामुळे मयत युवकांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डामरे टेंबली येथे हा भयंकर अपघात घडला. ट्रकचालक संतोष हनुमंत चव्हाण आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन तिवरे ते फोंडाघाट असा प्रवास करत होता. तर अपघातात मृत पावलेले विशाल गजानन चव्हाण आणि सुरज रमेश चव्हाण हे युवक मोटरसायकलने तिवरेच्या दिशेने जात होते. डामरे टेंम्बलीच्या वळणावर ट्रक आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक बसली. या अपघातात ट्रकवर आदळून विशाल आणि सूरज हे ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून चालक संतोष हनुमंत चव्हाण याने पलायन करून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केल्यामुळे मयत युवकांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांना त्यांच्या उद्रेकाचा सामना सहन करावा लागला. भयानक अपघात भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा भयानक अपघात घडला. ट्रक आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात विशाल आणि सुरज हे दोन युवक जागीच ठार झाले .अपघातानंतर या दोन युवकांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. अपघातात हे दोन युवक जागीच ठार झाल्याने अपघाताची भयानकता लक्षात येत होती. कुटूंबियांचा आक्रोश या भयानक अपघातात विशाल आले सुरत हे दोन युवक ठार झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे मन हेलावून गेले होते.
ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक तिवरे चव्हाणवाडीतील दोन युवक ठार
