जिल्हा नियोजनाची बैठक लावाच परत रत्नागिरीला जायला देणार नाही

भाजपा आमदार नितेश राणे यांचा पालकमंत्री उदय सामंत यांना इशारा

*⚡कणकवली ता.२३-:* जिल्हा नियोजनची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात लावली जात नाही.६ ते ८ महिने झाले ही बैठक झालेली नाही. भविष्यात होईल याची शक्यता नाही.शेतकऱ्यांना मदत नाही तसेच रस्त्यानाही पैसे नाहीत.कुडाळ- मालवणचे आमदार फक्त कोटी-कोटीच्या घोषणा करतात मात्र पैसे खड्ड्यात पडले आणि रस्ते गुळगुळीत झाले असे कुठे दिसत नाही.जिल्ह्याच्या विकासाला कोणीच वाली नाही.पालकमंत्री जिल्हात कुठे दिसत नाही की विकासकामे होत नाहीत.आता नाटके सुद्धा सुरू झाली आहेत. जिल्हा नियोजनाची बैठक लावाच परत रत्नागिरीला जायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिला.ते पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रश्नांवर बोलत होते. आमदार नितेश राणे म्हणाले, खासदार विनायक राऊत केंद्रात मंत्री नितीन गडकरींना जाऊन भेटतात, त्यांच्या समोर शेपूट हलवता आणि पंतप्रधान मोदींवर टीका करतात.राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हन यांच्याकडून एक रुपया आणू शकत नाहीत. ही यांची लायकी अशी टीका केली. ड्रग्सबद्दल बोलणारे शेतकऱ्यांबद्दल कधी बोलणार ? चपट्या पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्यासाठी प्रवृत्त केलंय. ड्रग्सबद्दल बोलायचं, एनसीबी बद्दल बोलायचं, पण शेतकऱ्यांबद्दल बोलायचं नाही.ड्रग्समधील श्रीमंतांची मुले सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीच करायचे नाही.ती काय खातात त्यांचे भविष्य कसे असेल या बद्दल बोलायचे नाही.दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या वाईट स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे, असा आरोप आम.नितेश राणे यांनी केला. मंत्री नवाब मलिक पाकिस्तानचे ‘एजंट’, ठाकरे सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे पाकिस्तानचे ‘एजंट’ झालेले आहेत.पाकिस्तानसाठी ते काम करत आहेत.पाकिस्तान मधून येणारा ड्रग्ज मुंबई सह महाराष्ट्रात पुरविणारे जे ड्रग्ज माफिया आहेत त्यांचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. अशी घणाघाती टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. एनसीबीने नवाब मलिक यांच्या जावयाला अशाच एका प्रकरणात अटक केली होती म्हणून ते या खात्यांची आणि अधिकाऱ्यांची बदनामी करत आहेत. शिवसेनेची मराठी नावाची अस्मिता आता कुठे गेली असा संतप्त सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी विचारला. आज राज्यातील ड्रग्ज माफिया शांत झोपत आहेत. कारण नवाब मलिक त्यांची पाठ राखण करत आहेत. खासदार संजय राऊत यांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व, हिंमत असेल तर मंत्री नवाब मलिक यांना शिकवावे.मराठी माणसाला टार्गेट केले जाते याचे उत्तम उदाहरण अधिकारी वानखेडे आहेत. असे असताना मराठी पक्ष, नेते,मुख्यमंत्री असतांना एकही शिवसैनिक जाब विचारत नाही म्हणजे ही शिवसेना कसली असा प्रश्नही आमदार नितेश राणे यांनी केला.

You cannot copy content of this page