*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली तालुक्यातील तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमीत्ताने विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी विविध वाचकांनी उपस्थिती दर्शवली. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे आजी माजी अध्यक्ष अशोक मुद्राळे आणि विनय पावसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी सुरेश तळेकर, चंद्रकांत तळेकर, ध्रुव बांदिवडेकर, सदाशिव पांचाळ, मिनेश तळेकर, प्रा. हेमंत महाडीक, ग्रंथपाल सौ. साक्षी तळेकर आदी उपस्थीत होते. गेले दिड वर्ष कोरोनामुळे प्रत्यक्ष संपर्क तुटला होता. बर्याच कालावधीसाठी वाचनालये बंद होती. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वाचनालयातील पुस्तकरुपी संपत्ती आपल्या वाचकांना पाहता यावी यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यानिमीत्त वाचकांनी वाचनालयात येऊन अनेक पुस्तके पाहिली. दिवसभर चाललेल्या या प्रदर्शनाला परिसरातील असंख्य वाचकांनी भेट दिली.
स्व. सुनील तळेकर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन व पुस्तकांचे प्रदर्शन
