मेढा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट…

कोणीही जख्मी नाही; मात्र घर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

*⚡वेंगुर्ले ता.२३-:* घरात जेवण बनवत असताना घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात घरातील कोणीही व्यक्ती जख्मी झाले नसून, घर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निवती मेढा येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी कोचरे घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे.

You cannot copy content of this page