युवा रक्तदाता संघटना आली धावून

रुग्णाला दिल्या ओ पॉझिटिव्ह प्लेटलेट्स

*⚡सावंतवाडी ता.२३-:* उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रविकिरण कलांगण या रुग्णाला तातडीने ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या प्लेटलेट्स ची गरज होती. यावेळी सहा दात्यांची आवश्यकता होती. यावेळी या रुग्णाच्या मदतीला युवा रक्तदाता संघटना धावून आली आहे. या रुग्णासाठी शहरातील प्रकाश चौधरी, अवधूत गावडे, आशिष साखळकर यांनी तातडीनं ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट डोनेशन केले. दरम्यान, ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या गीता वासुदेव पडवळ या रुग्णाला तातडीने ए पाॅझिटिव्ह या रक्तगटाच्या प्लेटलेट्स ची गरज होती तेव्हा असनिये येथील युवक हरी परांजपे, सुजय कोठावळे यांनी ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये जाऊन प्लेटलेट डोनेशन करत रूग्णांचे जीव वाचवले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या विशेष प्रयत्नातून रक्तदाते उपलब्ध करुन दिले. तर सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घेण्याच आवाहन केले.

You cannot copy content of this page