*⚡कणकवली ता.२३-:* राज्य सजसनाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मॉडेल स्कुल तथा आदर्श शाळा म्हणून गौरविण्यात आलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला नुकतीच रत्नागिरी जिल्हयातील राजापूर तालुक्यातील केळवली गावातील ग्रामस्थांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ गौरी शिंदे,माजी अध्यक्ष शिक्षणतज्ञ संतोष पाटणकर,समिती सदस्य श्री मनोज करंदीकर केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप श्रावणकर सर आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर केळवली ता.राजापूर या गावचे पोलीस पाटील सुरेंद्र सुरेश धामापूरकर,केळवली गाव तंटामुक्ती अध्यक्ष विठोबा गोविंद हरयाण, केळवली ग्रामस्थ शशिकांत मनोहर इंगळे तसेच हसोळ ता राजापूर या गावचे ग्रामपंचायत सदस्य आजीम कादर नाईक यांनी खारेपाटण केंद्र शाळेला भेट सदिच्छा भेट दिली. व शाळेची पाहणी करून शाळेच्या कामकाजा बाबत व शाळेच्या एकूण उपक्रमाबाबत कौतुक व समाधान व्यक्त करत शाळेला शुभेच्छा दिल्या. खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने शाळेच्या अध्यक्षा सौ. गौरी शिंदे यांच्या हस्ते मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर शाळेच्या एकूण कामकाज विषयी व येथील व्यवस्थापना बाबत तसेच नियोजनाबाबत शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी उपस्थितीत मान्यवरांना माहिती दिली. .
खारेपाटण केंद्रशाळेला केळवली ग्रामस्थानी दिली सदिच्छा भेट
