हागणदारी नसल्याने जिल्ह्याचे आरोग्यमान सुधारले – संजना सावंत
*⚡मालवण ता.१९-:* उघड्यावर शौचास जाण्याने सर्वात जास्त साथरोग पसरण्याची भीती असते. आपला जिल्ह्यात हागणदारी नसल्याने जिल्ह्याचे आरोग्यमान सुधारले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायत येथे जिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,…
