*⚡मालवण ता.१९-:* कोळंब भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिर येथे २९ रोजी गवळदेव उत्सव आणि चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वा. मूर्ती पूजा व अभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, ३ वा. श्री चरणी स्थानिक ग्रामस्थांची गाऱ्हाणी, ७ वा. भजने, रात्री ९.३० वा. रेकॉर्ड डान्स व एकांकीका होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन गोपाळकृष्ण मंडळाने केले आहे.
कोळंब येथे २९ रोजी गवळदेव उत्सव
