चंद्रकांत कासार यांची तिकिट मिळवण्यासाठी परबांवर टीका

माजगाव शक्ती केंद्र प्रमुख संतोष वेर्जे : विशाल परब हे राज्यस्तरीय नेते-:शिवसेनेच्या गटबाजीला श्री. कासारच जबाबदार

*⚡सावंतवाडी ता.१८-:* विशाल परब हे राज्यस्तरीय नेते असून, ते स्वतःचा हिमतीवर स्वतःचा पायावर उभे आहेत. चंद्रकांत कासार ही व्यक्ती विज चोर म्हणून गावात प्रसिद्ध असून, माणगाव येथील थर्मामीटर कंपनी बंद पाडून त्यानी अनेक तरुणांना भिकेस लावले आहे. विशाल परब यांच्यावर टीका करून तिकीट मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा टोला माजगाव शक्ती केंद्र प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य संतोष वेर्जे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, विशाल परब यांच्या वैयक्तिक व्यवसायांवर टीका करायची सोडून, तुम्ही किती युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला ते जाहीर करावे असे आवाहन त्यांनी यावेळी चंद्रकांत कासार यांना दिले आहे. शिवसेनेतील गटबाजीच्या राजकारणाला चंद्रकांत कासार हेच जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी त्यांनी ज्यांना गावात किंमत नाही, त्यांना जिल्ह्याच्या नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. अशा शब्दात टीका केली आहे. बी एस एन एल कंपनीशी साटेलोटे करून त्यांच्याकडून पैसे उकळून हफ्तेखोरगिरी करणे त्याचे काम असल्याचा गंभीर आरोप देखील संतोष वेर्जे यांनी चंद्रकांत कासार यांच्यावर केला आहे.

You cannot copy content of this page