मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा बांधकाम प्रभारी कार्यकारी अभियंता यांना इशारा
*⚡सावंतवाडी ता.१८-:* दायित्व असलेल्या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी नवीन टेंडर काढल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी बांधकाम विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांना दिला आहे. यावेळी त्यांनी दायित्व असलेल्या रस्त्यांची यादीच ठेकेदारासह आपल्याला सादर करा अशी मागणीही केली आहे. बांधकाम विभागाला आज माजी आमदार श्री उपरकर यांनी धडक दिली. यावेळी त्यांनी बांधकाम च्या विविध विषयाला हात घालत प्रभारी कार्यकारी अभियंता श्रीमती चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांच्या दुर्दशेला ठेकेदारासह प्रशासन आणि अधिकारी तितकेच जबाबदार आहेत. जर ठेकेदाराकडे पैसे नव्हते तर त्यांनी रस्त्यांच्या कामाचा ठेका का घेतला आणि जर ठेका घेतला होता. तर विहित मुदतीत काम न केल्याने त्यांचा ठेका रद्द का झाला नाही. आता ठेका रद्द करुन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम आपण करत आहात. एकीकडे जनता रस्त्यावरील खड्ड्यातून प्रवास करत असताना याबाबत अधिकारी वर्ग मात्र चिडीचुप का होता. असा सवाल श्री उपरकर यांनी उपस्थित केला. तर सद्यस्थितीत खड्डे बुजवण्यासाठी शासनाकडून किती निधी आला अशी विचारणा उपरकर यांनी श्रीमती चव्हाण यांना केली असतात नवीन कामासाठी निधी उपलब्ध झाला नसून जुन्या निधीतून खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे तर बऱ्याच ठिकाणी दायित्व असलेल्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले यावर जर दायित्व असलेल्या रस्त्यांची कामे सुरू आहेत तर अशा रस्त्यांच्या कामाला नव्याने टेंडर निघाल्यास मनसे गप्प बसणार नाही या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू त्यामुळे या रस्त्याची दायित्व आहेत आणि जी कामे सुरू आहेत अशा रस्त्यांची ठेकेदारास सहित यादी मला सादर करा अशी मागणी केली. तर जनतेमध्ये गैरसमज नको यासाठी दायित्व असलेल्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू आहेत याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना द्या जेणेकरून रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला नाही हे जनतेला समजेल. ज्या रस्त्यावर जिओ केबल टाकण्यात आली आहे आणि ते बुजवण्याचे काम या ठेकेदाराने घेतले आहे अशा ठेकेदारांची यादी व रस्ते कुठले याबाबतही आपल्याला माहिती मिळावी तसेच पुढचे रस्ते कुठच्या निधीतून नव्याने होणार आहेत त्याची यादी ही आपल्याला सादर करा असे मागणीही उपरकर यांनी केली शिवाय लवकरात लवकर कमी नियंत्रणात असली तरी जनतेला होणाऱ्या त्रासासाठी रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात यावी असेही उपरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपरकर यांच्या सोबत सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,संतोष भैरवकर, बाबल गावडे, बाळा बहिरे, आदेश सावंत, राजेश टंगसाळे, सुरेंद्र कोठावळे, शुभम सावंत, मंदार नाईक, प्रकाश साटेलकर, राजेश मामलेकर, संदेश शटये, गोविंद मोरये, तानाजी मेस्त्री, संतोष सावंत, सुमेध सावंत उपस्थित होते.
