सावंतवाडी : सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्यावतीने भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष अॅड. राघवेंद्र नार्वेकर, बबलू डिसोझा, बबन डिसोझा, राज पेडणेकर, महेश चितारी आदि पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान व भारतिय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या केंद्रबिंदु सुध्दा होत्या. सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर असण्याच्या बाबतीत त्या दुसऱ्या स्थानावर होत्या व प्रधानमंत्री कार्यालय सांभाळणाऱ्या आतापर्यंत त्या एकमेव महिला आहेत. त्यांची जयंती आज सावंतवाडी काँग्रेसच्यावतीने साजरी करण्यात आली.
सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्यावतीने इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
