राष्ट्रीय योजना विभागाचा पुरस्कार
*⚡वेंगुर्ले ता.१९-:* मुंबई युनिव्हर्सिटी राष्ट्रीय सेवा योजना, मुंबईतर्फे वेंगुर्लेतील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील ग्रामीण विकास विषयाचे प्राध्यापक तथा राष्ट्रीय सेवा विभाग योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विवेक शांताराम चव्हाण यांना जिल्हास्तरीय आदर्श कार्यक्रम अधिकारी तर बॅ. खर्डेकर महाविद्यालयास जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 12 जानेवारी रोजी मुंबई विद्यापिठाच्या ठिकाणी होणार आहे. या पुरस्काराचे लेखी पत्र मुंबई विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक सुधीर पुराणिक यांनी बँ. खर्डेकर महाविद्यालय व प्रा. विवेक चव्हाण यांना पाठविले आहे. बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात ग्रामीण विकास विषय शिकविणारे विवेक चव्हाण हे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी आहे. त्यांना गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत समाजपयोगी असे विविध उपक्रम राबविलेले आहेत. या निर्मल व्यवस्थापन अंतर्गत कचऱयातtन खत निर्मीती, निर्माल्य वय्वस्थापन अंतर्गत सागरी किनाऱ्यावरील स्वच्छता व वृक्षारोपण, कांदळवन संवर्धन, जैवविविधता संवर्धन, पाणी आडवा, पाणी जिरवा अंतर्गत जलसंवर्धनसाठी बंधारे, महाविद्यालयीन विद्यार्थ्याना कायदेविषयक जुजबी ज्ञान व्हावे. यासाठी तालुका विधी सेवा समितीच्या सहकार्यातून महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरे, सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षण उपक्रम, माfहला सक्षमीकरणासाठी माfहलांना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण व महिला विषयक कायद्याची माहिती, रस्ता सुरक्षा अभियाने अंतर्गत वेंगुर्लेत शहरांत जनजागृतीपर रॅली, मतदार जनजागृतीसाठी संपूर्ण शहरांत जनजागृती रॅली, आपदग्रस्तांसाठी मदत, रक्तदान शिबीरे, योगा सर्टिफिकेट कोर्स, आहार आणी व्यायाम या विषयी मार्गदर्शन, सेंद्रिय भाजीपाला मार्गदर्शन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेटलँड ब्रीफ डॉक्युमेंटेशन मध्ये विशेष सहभाग होता. असे विविध उपफक्रम महाविद्यालय स्तरावर व दत्तक गावांमध्ये राबविलेले आहेत. तसेच आंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांचे संशोधन पेपर्स प्रसिध्द झालेले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुबई विद्यापिठाने त्यांना जिल्हास्तरीय आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्ष्कार जाहिर केला आहे. हा पुरस्कार मुंबई विद्यापिठाकडून जाहिर होताच कोल्हापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाई, पेट्रनकौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासकिय अधिकारी डॉ. सौ. मंजिरी देसाई-मोरे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे
