Headlines

आचरा हिर्लेवाडी येथे घराला आग लागून नुकसान

*⚡मालवण ता.१९-:* आचरा हिर्लेवाडी येथील श्रीमती मीना अरुण मालवणकर यांच्या राहत्या घराला मागच्या बाजूने आग लागल्याने घरातील अन्नधान्य कपडेलत्ते जळून सुमारे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हिर्लेवाडी येथील मीना अरुण मालवणकर यांच्या घराला सकाळी मागच्या बाजूने अचानक आग लागली. मात्र ही आग कशामुळे लागली याचे…

Read More

कणकवली महाविद्यालयात शनिवारी कॅंपस इंटरव्ह्यू

*⚡कणकवली ता.१९-:* कणकवली येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम, व बी. एस्सी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि नोकरभरती कक्ष तसेच भारत फायनान्सियल इनक्लूजन लिमिटेड यांच्यावतीने महाविद्यालयात नोकरभरती मुलाखती( कॅंपस इंटरव्ह्यू) आयोजित केले आहेत. १८ ते २८ या वयोगटातील कोणत्याही शाखेचा पदवीधरांसाठी बँकिंग व‌ फायनान्स या क्षेत्रात दरमहा ठोक पगारावर उत्साही…

Read More

केंद्रसरकारच्या विरोधात कणकवलीत काँगेसची घोषणाबाजी

शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा *⚡कणकवली ता.१९-:* कृत्रिमरित्या महागाई करणाऱ्या व अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसने कणकवलीत जनजागरण निमित्त पदयात्रा काढली. तसेच पत्रके वाटण्यात आली, शेतकरीविरोधी काळे कायदे मोदी सरकारने मागे घेतल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग…

Read More

मालवणच्या सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव आणि दीपोत्सव साजरा…

मालवण (प्रतिनिधी) मालवण देऊळवाडा येथील मालवणचे ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेली श्री देव रामेश्वर – श्री देव नारायण यांची पालखी मिरवणूक व सुमारे ८ हजार कागदी कोनांच्या माळांची आरास आणि २ हजार पणत्यांची आरास करण्यात आली. आजकाल विविध उत्सवात प्लास्टिक फुले व…

Read More

ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांचा पडेल ग्रामपंचायतीमार्फत विशेष सत्कार…

बदली झाल्याने निरोप समारंभात केला सत्कार देवगड-प्रतिनिधी पडेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांची पडेल ग्रामपंचायती मधून सावंतवाडी येथे बदली झाल्याने पडेल ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी अडिज वर्षे सेवा बजावून प्रमाणिकपणाने कामगिरी केल्याबददल त्यांचा निरोप समारंभपर विशेष सत्कार करण्यात आला. पडेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांनी अडिज वर्षे पडेल ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारला होता. त्यांनी…

Read More

माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले नारुरच्या महालक्ष्मीचे दर्शन…

कुडाळ, दि. १९ (प्रतिनिधी) भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील नारुरच्या जागृत महालक्ष्मीचे दर्शन घेतले. कोकण आणि महाराष्ट्रावरील संकटांचे हरण कर, असे साकडे त्यांनी देवीला घातले. गावकर राजा तेली, मंदिरचे पुजारी यांनी नारळ श्रीफळ, महालक्ष्मीची प्रतिमा देऊन राणे यांचा सत्कार केला. यावेळी नीलेश राणे यांच्यासमवेत कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, ओरोस…

Read More

सबनीस दाम्पत्याला “राष्ट्रीय सावित्रीज्योती” पुरस्कार जाहीर

कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर *⚡कणकवली ता.१९-:* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा पहिलाच राष्ट्रीय सावित्रीजोती पुरस्कार कवयित्री ललिता सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर झाला आहे. त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या कवयित्री, कथाकार सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र…

Read More

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात २१ युनिट रक्त संकलन

*⚡कणकवली ता.१९-:* निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे संपूर्ण भारतवर्ष मध्ये रक्तदान शिबिर राबविले जातेे त्याचाच भाग म्हणून १८ नोव्हेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ब्रँचमध्ये मातोश्री मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये २१ युनिट रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन डाॅ. श्रीनिवास बेळणेकर (वैदयकीय अधिकारी, रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय,सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते करणेत…

Read More

मिठबाव फिशिंग सोसायटीच्या वतीने मच्छिमारांनी शासनाच्या योजनांचे लाभ घेण्याचे सूतोवाच

*⚡देवगड ता.१९-:* मच्छिमार बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा ! त्यासाठी आम्ही अधिकारी वर्ग सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. फक्त आपण आपल्या समस्या मोकळेपणाने मांडाव्यात असे मत्स्यव्यवसाय अधिकारी रवींद्र मालवणकर यांनी देवगड तालुक्यातील तांबळडेग येथे मिठबाव फिशिंग अँड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मच्छिमार बांधवाना मार्गदर्शन करताना मालवणकर बोलत…

Read More

शासनाने अंत न पाहता एस.टी.कर्मचाऱ्यांना वेळीच न्याय द्यावा

प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.१९-:* एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठीच आहे. त्यांना न्याय देण्याअगोदरच संप मोडीत काढणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार म्हणावा लागेल. शासनाचे हे कामगार विरोधी धोरण लक्षात घेऊन प्रत्येक कर्मचारी व प्रवासी जनतेने आता मोठी चळवळ उभी केली पाहीजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन…

Read More
You cannot copy content of this page