शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा
*⚡कणकवली ता.१९-:* कृत्रिमरित्या महागाई करणाऱ्या व अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसने कणकवलीत जनजागरण निमित्त पदयात्रा काढली. तसेच पत्रके वाटण्यात आली, शेतकरीविरोधी काळे कायदे मोदी सरकारने मागे घेतल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी विनायकराव देशमुख यांच्या हस्ते तसेच जिल्हाध्यक्ष बाळा गावडे ,माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत, महीला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर व शहर काँग्रेस अध्यक्ष महेश तेली यांच्या हस्ते सन विनायकराव देशमुख व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतरभारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिलेल्या जनजागरण अभियान कार्यक्रमा अंतर्गत कणकवली बाजारपेठेतून कृत्रिमरित्या महागाई करणाऱ्या व अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जनजागरण निमित्त पदयात्रा काढण्यात आली. तसेच पत्रके वाटण्यात आली, शेतकरीविरोधी काळे कायदे मोदी सरकारने मागे घेतल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी , काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, माजी जिल्हा अध्यक्ष विकासभाई सावंत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादा परब, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, प्रदेश सचिव (सोशल मीडिया ) गौरी तेली, पल्लवी तारी,केतन कुमार गावडे,प्रवीण वरूनकर, प्रदीपकुमार जाधव, निलेश मांलडकर, प्रदीप तळवडेकर, लॉरेन्स डिसोझा, रवी तेली, निलेश तेली, संतोष तेली, राजेंद्र पेडणेकर, संदीप कदम, समीर वंजारी, संतोष टक्के आदी काँग्रेस पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते, तसेच काँग्रेस प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
