Headlines

एका रक्तदात्यामुळे मिळू शकते नवजीवन…

सभापती हर्षदा वाळके:पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आज महारक्तदान शिबिर..

⚡कणकवली ता.२२-: एका रक्तदात्यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला नवजीवन मिळू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी केले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, सुप्रिया मेस्त्री, शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण गावडे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, प्रज्वल वर्दम, पप्पू पुजारे, सागर राणे, सदा चव्हाण, गणेश तळगावकर, स्वप्नील चिंदरकर, सुभाष मालंडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश सावंत, दीपक दळवी, सचिन पारधीये, प्रथमेश दळवी, सर्वेश दळवी, नगरसेविका मेघा गांगण, मनस्वी ठाणेकर, श्री. काणेकर, राजू हिर्लेकर, निसार शेख, संतोष गुरव आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना हर्षदा वाळके म्हणाल्या, आजच्या काळात अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांमुळे अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. अशा वेळी रक्ताचा तुटवडा जाणवू नये आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे.

त्या पुढे म्हणाल्या, पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे समाजहितासाठी अशा उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.

रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला असून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page