Headlines

जि प शाळा माजगाव नं ५ मध्ये योग दिन साजरा…

ऍड. पवित्रा धुरी यांचे योगविषयक मार्गदर्शन..

⚡कुडाळ ता.२२-: सावंतवाडी तालुक्यात जि प प्राथमिक शाळा , माजगाव नं ५ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने ॲड . पवित्रा धुरी यांनी मार्गदर्शन केले. योगाचे फायदे विशद केले. सुरुवातीलाच योगाविषयक प्रार्थना घेऊन योगासन प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले. नियमित योगा केल्याने शरीराला आणि मनाला होणारे फायदे विद्यार्थ्यांनी समजून घेतले. नियमित योगा करण्याचा संकल्प केला. यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारची आसने, ताडासन, वृक्षासन,भुजंगासन तसेच सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक करून घेतली. त्याचप्रमाणे प्राणायामचे प्रकार करून घेतले।
विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, माजी विद्यार्थी, अंगणवाडी विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस,पालक उपस्थित होते. त्या सर्वांनी या योग मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्राची दळवी व शिक्षिका श्रीमती मिलन पेडणेकर यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शकांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page