आचरा हिर्लेवाडी येथे घराला आग लागून नुकसान

*⚡मालवण ता.१९-:* आचरा हिर्लेवाडी येथील श्रीमती मीना अरुण मालवणकर यांच्या राहत्या घराला मागच्या बाजूने आग लागल्याने घरातील अन्नधान्य कपडेलत्ते जळून सुमारे ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. हिर्लेवाडी येथील मीना अरुण मालवणकर यांच्या घराला सकाळी मागच्या बाजूने अचानक आग लागली. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत घरातील अन्नधान्य व कपडे जळून नुकसान झाले. आग विझविण्यासाठी एकनाथ मालवणकर, सुर्यकांत मालवणकर, सुविधा मालवणकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविताना सुविधा मालवणकर हिच्या डोक्याला थोडी दुखापत झाली मात्र, तिची प्रकृती आता ठिक आहे.

You cannot copy content of this page