ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांचा पडेल ग्रामपंचायतीमार्फत विशेष सत्कार…

बदली झाल्याने निरोप समारंभात केला सत्कार

देवगड-प्रतिनिधी पडेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांची पडेल ग्रामपंचायती मधून सावंतवाडी येथे बदली झाल्याने पडेल ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी अडिज वर्षे सेवा बजावून प्रमाणिकपणाने कामगिरी केल्याबददल त्यांचा निरोप समारंभपर विशेष सत्कार करण्यात आला. पडेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांनी अडिज वर्षे पडेल ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारला होता. त्यांनी गावच्या विकासाला ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल पडेल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पडेल गावचे सरपंच विकास दिक्षित,उपसरपंच सुभाष घाडी,ग्रामपंचायत सदस्य् शैलेश टुकरुल,दशरथ टुकरुल,अविनाश फाळके,अमित घाडी,स्नेहा तानवडे,प्राजक्ता कुळकर,सुहानी वारिक व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच पडेल हायस्कुलचे मुख्याध्यापक हिराचंद्र तानवडे,वैभव वारिक यांनी देखील त्यांचा विशेष सत्कार केला. एन.आर.तांबे यांनी अडिज वर्षाच्या कालावधीमध्ये पडेल गावचा कारभार सांभाळत असताना त्यांनी लोकाभिमुख ग्रामपंचायत होण्याच्या दृष्टीकोनातून काम केले आहे. यावेळी सरपंच विकास दिक्षित बोलताना म्हणाले की, पडेल ग्रामपंचायतीचा विकास करतेवेळी ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. गावचा विकास करतेवेळी त्यांनी गावचे ग्रामविकास अधिकारी म्हणून अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामुळे आम्हाला गावचा विकास करतेवेळी कोणतीही अडचण भासलेली नाही असे गौरवोव्दार काढुन एन आर तांबे यांची सावंतवाडी येथे बदली झाल्याने त्यांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देवून ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. ग्रामविकास अधिकारी एन आर तांबे म्हणाले, पडेल गावचा ग्रामविकास अधिकारी पदाचा गेले अडिज वर्षे कारभार स्वीकारल्यानंतर पडेल गावातील ग्रामस्थांनी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य् यांचे चांगले सहकार्य लाभल्यामुळे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करीत असताना कधीही कोणतीही अडचण आपणास आलेली नाही. १४ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करतेवेळी गावातील ग्रामस्थांचे सरपंच व सदस्यांचे सहकार्य महत्वाचे होते. यामुळे पडेल गावातील मिळालेला अनुभव आपल्या जीवनामधील आदर्शवत ठरणारा असा अनुभव असून पुढील ग्रामपंचायतीमध्ये काम करताना या अनुभवाचा मला नक्कीच फायदा होणार आहे.

You cannot copy content of this page