Headlines

केवळ दैव बलवत्तर…

भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांची कार्यतत्परता.. ⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्गांवर बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मठ ठाकुरवाडी येथील वळणावर एका मालवाहतूक ट्रकला अडकून झाडाच्या फ़ांद्या तुटून मुख्य रस्त्यावर पडल्या. सुदैवाने यावेळी मागाहून प्रवास करणारे दोन दुचाकीस्वार यातून थोडक्यात बचावले होते.याबाबत माहिती मिळताच मठ येथील भाजपचे पदाधिकारी अजित नाईक, मंगेश ठाकूर, सिद्धेश…

Read Full News

डिझेल दरवाढीचा कोकणातील मच्छीमारांना फटका ; व्यवसायावर संक्रांत, आंदोलनाचा इशारा…

आखाती युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम; रिटेल दराने डिझेल देण्याची मागणी, खासदार नारायण राणे यांची भेट घेणार.. ⚡कणकवली ता.०२-: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट कोकणच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना बसू लागला आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने डिझेलच्या दरात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे मच्छीमार पूर्णपणे हवालदिल झाले असून, व्यवसायावरच संक्रांत आली असल्याचे मच्छीमार नेते ज्ञानेश्वर खवळे यांनी म्हटले आहे….

Read Full News

बांद्यात पावसाळापूर्व वीज व्यवस्थेची कामे तातडीने करण्याची मागणी…

⚡बांदा ता.०२-: बांदा शहरात दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे रस्त्याकडील जीर्ण झाडे व फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडण्याच्या घटना घडतात. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन नागरिक, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर भाजपाचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांनी महावितरणच्या सावंतवाडी कार्यालयाला भेट देऊन पावसाळापूर्व कामांचे नियोजन तातडीने करण्याची मागणी…

Read Full News

जखमी घार पिल्लाचे वनविभागाकडून तत्काळ रेस्क्यू.

⚡बांदा ता.०२-: बांदा येथील देऊळवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळलेल्या घार पक्ष्याच्या पिल्लाला वनविभागाच्या आरआरटी (रॅपिड रेस्क्यू टीम) पथकाने तातडीने रेस्क्यू करून जीवदान दिले.देऊळवाडी येथे घार पक्ष्याचे पिल्लू जखमी अवस्थेत पडल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. ही बाब माजी सरपंच आबा धारगळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या आरआरटी पथकाने…

Read Full News

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी आता लिफ्टची सोय…

माजी मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते लोकार्पण :नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसलेंची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.०२-: उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीत लावण्यात आलेल्या नव्या लिफ्टचे लोकार्पण माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उपस्थित होत्या. या सुविधेचा फायदा रुग्ण आणि वृद्ध नागरिकांना करून देण्यात येणार आहे. याचे लोकार्पण आज माजी मंत्री आमदार…

Read Full News

लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया सुरू..

⚡ओरोस ता २-: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८१ (१) (ब) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम ६९ (१) (फ) नुसार सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी राज्यस्तरीय लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून https//mahasahakar.maharashtra.gov.in/en/ या पोर्टलवर ६ एप्रिल २०२६ ते २०…

Read Full News

जुनी पेन्शन योजना लागू करा…

शिक्षकांची मागणी: जिल्हा परिषद अध्यक्षांची सकारात्मक भूमिका.. ⚡ओरोस, ता. २ -: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन सन २००७, २००८ व २००९ मध्ये सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. यावर अध्यक्षांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रस्तावांना गती देण्याचे आश्वासन दिल्याने…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संगणकीकरणात आघाडी; राज्यात अव्वल कामगिरी…

⚡ओरोस ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत कार्यरत प्राथमिक सेवा सहकारी संस्थांनी संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात डिजिटल परिवर्तनाचा आदर्श निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने आणि नाबार्डने संगणकीकरण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१४ संस्थाना E-PACs म्हणून घोषित केले आहे. परिणामी राज्यातील ३३ जिल्हा बँकांत सिंधुदुर्ग जिल्हा बँक…

Read Full News

वाफोली धरण कोरडे; गळती व सुरुंग स्फोटांमुळे पाणीसाठ्यावर संकट…

बांदा/प्रतिनिधीवाफोली येथील लघु पाटबंधारेच्या धरणात सध्या शून्य पाणीसाठा असल्याची गंभीर बाब येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय सावळ यांनी निदर्शनास आणून दिली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी मे महिन्यापर्यंत या धरणात पाणी उपलब्ध असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गेट वेलला लागलेल्या गळतीमुळे तसेच क्वारीत होणाऱ्या सततच्या सुरुंग स्फोटमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.त्यांनी…

Read Full News

भाजपच्यावतीने संसद कोकण समृद्ध महोत्सव २०२६ चे आयोजन…

खा राणेंच्या वाढदिवसाचे निमित्त:जिल्हाभरात विविध क्रीडा स्पर्धा:प्रभाकर सावंत यांची माहिती.. ओरोस ता २माजी मुख्यमंत्री खा नारायण राणे यांचा १० एप्रिल २०२६ रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त भाजप पक्षाने संसद कोकण समृद्ध महोत्सव २०२६ चे आयोजन केले आहे. यानिमित्त पक्षाच्यावतीने प्रत्येक तालुक्यात जिल्हा, राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page