विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : श्री. संदीप साटम…

⚡देवगड ता.११-:
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील सांडवे गावासाठी मुख्य रस्ता ते पाताडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण या विकासकामास सन २०२५–२६ साठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या मंजूर कामाचे भूमिपूजन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच तुकेश परब यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष नार्वेकर, देवगड नायब तहसीलदार संतोष खरात, सरपंच सुहास परब, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश मांजरेकर, बूथ अध्यक्ष संतोष वरक, करण चिंदरकर, ठेकेदार गुरुनाथ जंगले, चेतन वरक, नारायण परब तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्याच्या कामास मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. तसेच पालकमंत्री मा. नितेश राणे यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली असल्याचे भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी यावेळी सांगितले .

You cannot copy content of this page