देवगड–जामसंडे नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा …

स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी..

⚡देवगड ता.११-:
देवगड–जामसंडे नगरपंचायतीस कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी स्वीकृत नगरसेवक सुधीर तांबे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवगड–जामसंडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची बदली दि. २३ जून २०२५ रोजी झाल्यापासून सदर पद रिक्त असून, सध्या प्रभारी अतिरिक्त कार्यभारावर कारभार सुरू आहे. सध्या नगरपंचायतीचा प्रभारी कारभार सौ. गौरी पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे.मात्र प्रभारी व्यवस्थेमुळे नगर पंचायतीच्या दैनंदिन प्रशासनासह महत्त्वाच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याचे नगरसेवक तांबे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांना, ग्रामस्थांच्या घरबांधणी व घरदुरुस्ती परवानगी, तसेच देवगड–जामसंडे शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती, नुतनीकरण व नव्या प्रस्तावांना तातडीच्या प्रशासकीय मंजुरीची आवश्यकता आहे.मात्र कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने निर्णयप्रक्रियेत विलंब होत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होण्यासाठी देवगड–जामसंडे नगरपंचायतीस तात्काळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक सुधीर तांबे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.तसेच याबाबतची निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच नगरविकास शाखा, सिंधुदुर्ग यांनाही देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page