विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती: सैनिक भवनाचे परिसरातून होत आहे कौतुक..
⚡सावंतवाडी ता.११-:
माडखोल गावातील आजी माजी सैनिक संघाने साकारलेल्या सैनिक भवनाचे उद्घाटन सोमवार १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
देशसेवेत माडखोल गावातील आजी माजी सैनिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गावातील सर्व आजी-माजी सैनिक एकाच व्यासपीठावर यावेत तसेच त्यांच्या प्रश्न व समस्या सोडविण्याबाबत एक हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी हे सैनिक भवन साकारण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील आजी माजी सैनिकांचे सैनिक भवनाचे स्वप्न साकार होत आहे. सुमारे १६ लाख रुपये खर्च करून हे प्रशस्त सैनिक भवन साकारण्यात आले असून त्यात सुसज्ज कार्यालय व सभागृहासह इतर सुविधा आहेत. या सैनिक भवनासाठी इतर मान्यवर व्यक्तीचेही सहकार्य लाभले. हे सैनिक भवन एक इमारत नव्हे तर ते देशासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या त्यागाचे प्रतीक ठरणार आहे. आजी माजी सैनिकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यात हे सैनिक भवन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आजी माजी सैनिकांनी संघटित होऊन साकारलेल्या या सैनिक भवनाचे परिसरातून कौतुक होत आहे.या कार्यक्रमाला समस्त आजी माजी सैनिकांसह ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन माडखोल आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मसाजी राऊळ, उपाध्यक्ष जगन्नाथ परब, सचिव उमेश कारीवडेकर आणि आजी-माजी सैनिकांनी केले आहे.
