Headlines

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने किरण टेबुलकर यांचा शिवसेनेने केला सत्कार…

देवगड, (प्रतिनिधी) तालुक्यातील किंजवडे गावचे सुपुत्र विद्यमान युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीतील प्रमुख शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालय देवगड येथे नगराध्यक्षा साक्षी प्रभू आरोग्य शिक्षण सभापती नितीन बांदेकर यांच्या उपस्थीतीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ,…

Read More

देवगड आगारातून रत्नागिरी आणि कोल्हापूर अशा दोन फेऱ्या उद्या पासून सुरू…

देवगड देवगड आगारातुन मंगळवार दि.८मार्च पासून देवगड कोल्हापूर स.७वा., देवगड रत्नागिरी स.९वा. अशा दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहेत कोल्हापूर देवगड ही परतीची प्रवासी फेरी दु .१२ वा. कोल्हापूर येथून सुटणार आहे.तर रत्नागिरी देवगड परतीची फेरी रत्नागिरीहून दु २.वा देवगड कडे निघणार आहे. रापम कर्मचाऱ्यांचा संप (दुखवटा) सुरू असताना वारंवार कामगारांना कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात बैठक

कणकवली ता.०७-:* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु असून त्याबाबतची पुढील कार्यवाही व नियोजनाच्या दृष्टीने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या समवेत खासदार विनायक राऊत,सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. एस. एस. मोरे यांची मुंबई…

Read More

प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

🎊 *भव्य उद्घाटन सोहळा* 🎊 ✴️ *प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन* ✴️ ✨( ५ स्टार प्रशिक्षण केन्द्र ) ✨ ✳️ *किमान कौशल्य विकास कार्यक्रम* जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) 🧮सन *२०२१-२२* च्या तुकड्यांच्या प्रशिक्षणाचे औचित्य साधून ✴️ *मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२* रोजी ☸️ *सायंकाळी ४.००* वाजता उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. तरी या…

Read More

युवक काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी किरण टेंबुलकर यांची नियुक्ती…

देवगड-प्रतिनिधी युवक जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी किरण टेंबुलकर यांची प्रदेश काँग्रेसच्यावतीने निवड करण्यात आली आहे. यामुळे देवगड काँग्रेसच्यावतीने फटाक्याची आतषबाजी व घोषणाबाजी करीत टेंबूलकर यांच्या निवडीमुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षांतर्गत जिल्हयामध्ये ऑनलाईन पध्दतीने मतदान घेण्यात आले होते. यामध्ये युवक काँग्रेसचे जिल्हयामधील अध्यक्षपदासाठी किरण टेंबुलकर सह पाच उमेदवार उभे होते. यामधील…

Read More

जिल्ह्यात पुरेसे कटर नसल्याने शवविच्छेदन लांबतात

आरोग्य समितीत झाले उघड;मानधन वाढवून देण्याचा केला ठराव सिंधुदुर्गनगरी ता ०७ मृतदेहाचे पोस्टमार्टम (शवविच्छेदन) करताना कटरमॅनची (सफाईगार) फार आवश्यकता असते. मात्र त्याला मानधन कमी असल्याने हे काम करायला कोणीही तयार होत नाही. तरी त्याचे मानधन १५०० रुपये पर्यंत वाढविण्यात यावे, असा ठराव आज पार पडलेल्या आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा…

Read More

तब्बल सहा महिन्यांचा पोषण मुलांना नाही मिळाला

मुले कुपोषणमुक्त कशी होणार;महिला व बालविकास सभेत उपस्थित झाला प्रश्न सिंधुदुर्गनगरी ता ०७ जिल्हा परिषदमार्फत देण्यात येणारा पोषण आहार ऑगस्ट महिन्यापर्यंतच वितरित करण्यात आला असून अद्यापही सहा महिन्यांचा पोषण आहार देण्यात आलेला नाही. पोषण आहाराचा लाभ योग्य वेळी न दिल्यास जिल्ह्यातील कुपोषित मुलांची संख्या कमी कशी होणार? अशी विचारणा सभाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी केली तसेच…

Read More

यासाठी अंगणवाडी कृती समितीने सुरू केले आहे धरणे आंदोलन

ओरोस-:राज्य शासनाने अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी अंगण व सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सात ते दहा मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते चार या वेळेत धरणे आंदोलन सुरू केले आहे आज झालेल्या धरणे आंदोलनामध्ये वैभव वाडी व देवगड तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या…

Read More

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको

ओबीसी महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन *⚡ओरोस ता.०७-:* सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण नाकारले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे भविष्यात त्याच पद्धतीने निवडणुका होण्याची भीती ओबीसी समाजाकडून व्यक्त होत आहे. यासाठी राज्य शासनाने खंबीरपणे व जलदगतीने पावले उचलावीत. अन्यथा ओबीसी समाज यापुढे कोणतीही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ देणार नाही, असा…

Read More

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतुकीवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई

सावंतवाडीतील एक जण ताब्यात; १० लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त बांदा ता.०७-:* गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात कोल्हापूर भरारी पथकाने आज बांद्यात कारवाई केली. या कारवाईत गोल्डन आईस ब्ल्यू फाईन व्हिस्कीचे एकूण ७८ बॉक्स (९५६ बाटल्या) जप्त करण्यात आल्या. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ असा एकूण १० लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात…

Read More
You cannot copy content of this page