देवगड, (प्रतिनिधी) तालुक्यातील किंजवडे गावचे सुपुत्र विद्यमान युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीतील प्रमुख शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालय देवगड येथे नगराध्यक्षा साक्षी प्रभू आरोग्य शिक्षण सभापती नितीन बांदेकर यांच्या उपस्थीतीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. , माजी नगरसेविका हर्षा ठाकूर अमोल लोके,गणेश गावकर विभाग प्रमुख गणेश वाळके,निकिता जोशी,स्वप्नाली वाल्मिकी, निधी देशपांडे,श्रीकांत मल्हार, विकास कोयंडे तसेच काँग्रेस तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर,सज्जाउद्दीन सोलकर, सुगंधा साटम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
