गडकिल्ले स्पर्धेत जयराम सोनार प्रथम

स्वराज्य संघटनेचे आयोजन

सावंतवाडी ता.०८-:* शिवजयंती निमित्त स्वराज्य संघटना सावंतवाडी यांनी आयोजित केलेल्या गडकिल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेत प्रथम जयराम सोनार-सबनीसवाडा (किल्ले सिंहगड, पारितोषिक रोख रक्कम रु.११०००), द्वितीय योगेश खोरागडे, पवन पाटील, प्रसाद खोरागडे, यश लाखे (किल्ले विजयदुर्ग, रु. ७०००) आणि तृतीय सोहन सावंत, सुधीर चव्हाण, सबनीसवाडा ( किल्ले पन्हाळा, रु. ५०००) यांनी यश मिळविले.

बक्षीस वितरण कार्यक्रम श्रीमंत शिवरामराजे पुतळानजीक मोती तलावाच्या काठावर सोमवारी रात्री ८.३० वाजता उत्साहात पार पडला. याप्रसंगी स्वराज्य संघटनेचे कार्याध्यक्ष अमोल साटेलकर, पत्रकार सिताराम गावडे, डॉ. सोनल लेले, ॲड. राजू कासकर, श्रीपाद सावंत, उमेश कोरगावकर, समीर वंजारी, अमोल केसरकर, दिनेश गावडे, सोमनाथ गावडे, एल. एस. निचम, सुमेत गावडे, अंकित तेंडुलकर, संदीप धुरी, कृष्णा, विजय लाखे उपस्थित होते.

You cannot copy content of this page