देवगड आगारातून रत्नागिरी आणि कोल्हापूर अशा दोन फेऱ्या उद्या पासून सुरू…

देवगड देवगड आगारातुन मंगळवार दि.८मार्च पासून देवगड कोल्हापूर स.७वा., देवगड रत्नागिरी स.९वा. अशा दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहेत कोल्हापूर देवगड ही परतीची प्रवासी फेरी दु .१२ वा. कोल्हापूर येथून सुटणार आहे.तर रत्नागिरी देवगड परतीची फेरी रत्नागिरीहून दु २.वा देवगड कडे निघणार आहे.

रापम कर्मचाऱ्यांचा संप (दुखवटा) सुरू असताना वारंवार कामगारांना कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर देवगड आगारात आतापर्यंत ४ चालक २ वाहक,२ चालक कम वाहक असे एकूण ८कर्मचारी कामावर हजर झाले आहेत .देवगड आगारातून यापूर्वी देवगड सावंतवाडी या मार्गावर एकमेव प्रवासी फेरी सुरू करून त्या फेरीला १०० टक्क्यांपेक्षा अधिक भारमान मिळत असून देवगड कोल्हापूर व देवगड रत्नागिरी,

या प्रवासी फेऱ्या प्राधान्याने येत्या मंगळवार पासून सुरू करण्यात येणार आहे.आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर,सहा वाह.निरीक्षक लवू सरवदे हे अधिकाधिक प्रवासी फेऱ्या सुरू करण्याकरिता विशेष मेहनत घेत आहेत.

You cannot copy content of this page