यासाठी अंगणवाडी कृती समितीने सुरू केले आहे धरणे आंदोलन

ओरोस-:राज्य शासनाने अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे या अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करावी यासाठी अंगण व सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सात ते दहा मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी दोन ते चार या वेळेत धरणे आंदोलन सुरू केले आहे आज झालेल्या धरणे आंदोलनामध्ये वैभव वाडी व देवगड तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या

यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्यासह वैभववाडी तालुक्यातील शितल साळू साळुंखे अर्चना गांधी सविता नाईक तर देवगड तालुक्यातील अपरणा जोशी अनुजा जोशी शरायु हिरलेकर मृणाल नाईक आधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह शेकडोंच्या संख्येने कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य महा विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि त्याने एकत्रित चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरविला त्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविणे आणि त्यांना इतर सुविधा देणे या कार्यक्रमाला अग्रस्थान दिले आहे दोन वर्षे कोरूना ने जनतेला सरकारला वेठीस धरले म्हणून आम्ही अंगणवाडी कर्मचारी सामाजिक जबाबदारी म्हणून या सरकारवर आर्थिक बोजा वाढवणार या मागण्या केल्या होत्या मात्र दोन हजार पंधरा ला राज्य सरकारने मानधनात वाढ केली त्यानंतर गेले पाच वर्षे कोणतीच वाट केलेली नाही त्या तुलनेत महागाई तिपटीने वाढली आहे कोरोनाने घरासतील कर्त्या पुरुषाची नोकरी गेली आहे. अन्न सुरक्षा योजनेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रास्तधान्य बंद केले आहे. मदतनीस वर्षाला ५४ हजार मानधन घेऊन चार व्यक्तींच्या कुटुंबाचे घर, मुलांचे शिक्षण व आजारपण कसे काय निभावणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने महाराष्ट्रभर मानधन वाढ, पेंशन, आहार दर वाढविणे, नवीन मोबाईल देणे यासाठी ११ मार्च रोजी सादर होणाऱ्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची शासनाला आठवण करून द्यावी, यासाठी आंदोलने सुरू केली आहेत.

त्याचाच भाग म्हणून ७ ते १० मार्च या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी २ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज पहिल्या दिवशी देवगड व वैभववाडी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी मोठं मोठ्याने घोषणा देत जिल्हाधिकारी प्रवेशद्वार हादरवून सोडले होते. यावेळी ‘मानधन नको, वेतन हवे’, ‘भाऊबीज नको,बोनस हवा’, ‘मानधन वाढ आणि पेंशन मिळालीच पाहिजे’ अशा विविध घोषणा दिल्या.

You cannot copy content of this page