Headlines

दोडामार्ग येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर;…

अनेक वर्षांची आरोग्य समस्या मिटणार… दोडामार्ग ता.२६-:* गेल्या अनेक वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यातील जनतेला गोवा राज्यातील आरोग्य सुविधांवर अवलंबून राहावे लागत आहे.आता दोडामार्ग येथे उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झाले आहे. साटेली भेडशी येथील नवीन आरोग्य केंद्र इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे.लवकरच लोकापर्ण सोहळा होणार आहे तेव्हा येथील रुग्णांना गोवा येथे किरकोळ आजार उपचार यासाठी गोवा येथे जाण्याची…

Read More

गणित प्राविण्य परीक्षेत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या ५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या पाचही जणांची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी इयत्ता पाचवी…

Read More

मेढा येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीमुळे नागरिकांमध्ये समाधान

सुदेश आचरेकर यांचा पाठपुरावा मालवण ता.२६-:* मालवण शहरातील मेढा भागातील तालुका स्कुल समोरील विद्युत ट्रान्सफॉर्मरचा डीपी बॉक्समध्ये बिघाड झाल्याने मेढा भागात गेल्या काही दिवसात विजेचा दाब कमी जास्त होऊन काही घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याने याबाबत नागरिकांनी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे लक्ष वेधले. आचरेकर यांनी याबाबत वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर वीज कंपनीकडून हा…

Read More

कलंबिस्त येथील दोन रस्त्यांचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन…

सावंतवाडी ता.२६-: कलंबिस्त येथील वेले मुख्य रस्ता ते पास्ते वस व वेले मुख्य रस्ता ते हरिजनवाडी कडे जाणारा रस्ता अश्या दोन्ही रस्त्याचे भूमिपूजन आज तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी रस्ता होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार-खासदार पालक मंत्री यांचे आभार मानले यावेळी उपतालुका प्रमुख संदीप माळकर विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ उपविभाग…

Read More

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इन्सुलीतील एक युवक ताब्यात…

कोल्हापूर येथील पथकाची कारवाई; ८ लाख ७८ हजार ३२० रुपयाचा मुद्देमाल जप्त बांदा,ता.२६-:* बेकायदा दारू वाहतूक करताना कोल्हापूरच्या भरारी पथकाने इन्सुलीतील एकाला गवसे येथे ताब्यात घेतले. ही कारवाई काल आंबोली-आजरा मार्गावर करण्यात आली. यात संशयिताकडून ८ लाख ७८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डॅनीश कामील फर्नांडिस (२६,…

Read More

युवा सेनेच्या स्पर्धेतून राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टू तयार होतील

सुशांत नाईक;कणकवली युवा सेनेच्या क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन कणकवली ता.२६-:* कणकवली युवा सेनेतर्फे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य असून या स्पर्धेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील,असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सिंधुदुर्ग बँकेचे संचालक सुशांत उर्फ बाबू नाईक यांनी केले. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर युवासेनेच्यावतीने चौंडेश्वरी मंदिर समोरील फौजदारवाडी येथील…

Read More

सचिन गडेकर यांनी स्व: खर्चातून बुजवले आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे खड्डे…

वेंगुर्ला ता.२६-:* आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणा-या रस्त्यावरील खड्डे बांधकाम व्यावसायीक व आडेली येथील रहिवासी सचिन गडेकर यांनी स्वखर्चातून बुजविले. आडेली-खुटवळवाडी ते झारापकडे जाणा-या मार्गावरील कौल कारखाना ते आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या मार्गावर खड्डे पडून दूरावस्था झाली होती. शासनाने दुर्लक्ष केल्याने निदान या रस्त्याची डागडुजी तरी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत होती. सामाजिक कार्यकर्ते तथा…

Read More

सिंधुदुर्गच्या विकास कामात वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा-ब्रिगेडियर सावंत

वेंगुर्ला ता.२६-:* आपण राजकारणात आल्यापासून ते शेवटपर्यंत दीनानाथ वेर्णेकर हे आपल्यासोबत होते. मी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला त्यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. मी खासदार असताना सिधुदुर्ग जिल्ह्यात जी जी विकासकामे केली त्यात तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या उभारणीतही वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा असल्याची माहिती बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी शोकसभेत बोलताना दिली. वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष,…

Read More

‘वातावरणातील बदलाचे गांभीर्य’ याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मालवण ता.२६-:* गेल्या काही वर्षांत हवामानात झालेला बदल प्रकर्षांने जाणवत आहे. याचाच अभ्यास आणि कृती करण्यासाठी मालवण येथील मेगल डिसोझा हिने मालवण मधील युवक-युवतींना एकत्र येवून यूथ बीट फाॅर क्लायमेट या ग्रुपची स्थापना केली असून या ग्रुपच्या वतीने त्याच्या वतीने इंदिरा काॅम्प्लेक्स, धुरीवाडा मालवण येथे ‘वातावरणातील बदलाचे गांभीर्य’ या विषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे संपन्न झाली. यावेळी…

Read More

मेढा येथे चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा

मालवण ता.२६-:* मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त चौकचार मित्रमंडळाच्या वतीने पारंपारिक घुमट वादन व नृत्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. मांड उत्सवानिमित्त चौकचार घुमटी फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. यावेळी सकाळपासून दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून पूजा अर्चा करून नवस बोलले व फेडले….

Read More
You cannot copy content of this page